क्रीडाताज्या बातम्या

शार्दुलने किवींना लावला ब्रेक! विजयाच्या अशा मावळळ्या? भारताचा विजयाचा मार्ग मोकळा…

इंदौर : (India Vs New Zealand 3rd ODI) भारताचे (Team India) 386 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या किवींना दुसऱ्याच षटकात हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) पहिला धक्का दिला. मात्र डेवॉन कॉन्वे (Devon Conway) आणि हेन्री निकोल्स (henry Nicholls) यांनी किवींचा डाव सावरत दुसऱ्या विकेटसाठी 106 धावांची शतकी भागीदारी रचली.

Sharma Gill 13

ही जोडीन अखेर कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) निकोल्सला 42 धावांवर बाद करत फोडली. मात्र हेन्री निकोल्स (Henry Nicholls) बाद झाल्यानंतर सलामीवीर डेवॉन कॉन्वेने किवींच्या (New Zealand) डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याने 71 चेंडूत शतकी खेळी करत न्यूझीलंडला 24 षटकात 175 धावांपर्यंत पोहचवले.

Sharma Gill 9

मात्र शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) 26 व्या षटकात डॅरेल मिचेल (24) आणि टॉम लॅथम यांना पाठोपाठच्या चेंडूवर बाद करत किवींचा झंजावात रोखण्याचा प्रयत्न केला. शार्दुलनेच 28 व्या षटकात ग्लेन फिलिप्सला 5 धावांवर बाद करत किवींची अवस्था 5 बाद 200 धावा अशी केली.

Sharma Gill 10

शार्दुलने जरी किवींना पाठोपाठ धक्के दिले असले तरी शतकवीर डेवॉन कॉन्वे मात्र एकाकी झुंज देत होता. मात्र अखेर उमरान मलिकने त्याचा अडसर दूर केला. कॉन्वेने 100 चेंडूत 138 धावांची तुफानी खेळी केली.

Sharma Gill 12

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये