…तोपर्यंत महाविकास आघाडीत फूट पडू शकत नाही; अजित पवारांचं स्पष्टीकरण

पुणे : (Ajit Pawar On Eknath Shinde) महाविकास आघाडीच्या फुटीबाबत विरोधीपक्षनेते अजित पवार अजित पवार यांना प्रश्न विचारलता असता ते म्हणाले, शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार अशा चर्चा सुरु असतील तर अशा प्रकारच्या चर्चेला अर्थ नसतो. जोपर्यंत शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीला आशिर्वाद आहेत. तोपर्यंत यात फुट पडणार नाही किंवा महाविकास आघाडीतील लोकांना अडचण देखील नाही, असं स्पष्टीकरण देत त्यांनी महाविकास आघाडीत फूटीच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
महाविकास आघाडीच्या आमदारांच्या कामाला स्थगिती दिली आहे. मात्र त्यात देखील काही प्रमाणात स्थगिती उठलेली आहे. त्यात उड्डाणपुलांचा देखील समावेश आहे. व्हाईट बुकमध्ये विधिमंडळाची मान्यता मिळाली आहे. सभागृहाची मान्यता मिळाली आहे, अशा वेळेस ती काम थांबवणं उचित नाही. तुम्ही तुमची नवीन कामे मंजूर करा, त्या कामाला गती द्या, यामध्ये दुमत असायचं काही कारण नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
आपल्याला जोपर्यंत 145 आमदारांचा पाठिंबा मिळवतो तो सरकार स्थापन करतात हे सिद्ध झालेलं नाही त्यामुळे राज्यकर्त्यांनी आपणच कायमचा राहणार आहोत, असं समजू नये आणि तशी विरोधकांना वागणूक देऊ नये, असं त्यांंनी सरकारला खडसावलं आहे.