अक्षय केळकर ठरला बिग बॉस मराठी सीजन 4 चा विजेता
BIGG BBOSS MARATHI FINAL : (Bigg Boss Marathi 4 wineer) बिग बॉस मराठी सीजन 4 चा महाअंतिम सोहोळा आज पार पडला. 100 दिवस चाललेल्या या बिग बॉस मराठी सीजन 4 चा आजचा शेवटचा दिवस होता. या सीजन मध्ये अक्षय केळकर ने बाजी मारली. (Bigg Boss Marathi 4 Final, Akshay Kelkar winner of the Bigg Biss Marathi Season 4)
‘बिग बॉस मराठी 4’चा महाअंतिम सोहळा आज (८ जानेवारी) दिमाखात पार पडला. यंदा बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. तब्बल १०० दिवसांचा खेळ पूर्ण केल्यानंतर ‘बिग बॉस’च्या घराला टॉप ५ सदस्य मिळाले. यात अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, राखी सावंत, किरण माने आणि अमृता धोंगडे या स्पर्धकांचा समावेश होता. त्यानंतर वेगवेगळ्या टास्कमधून एक एक स्पर्धक बाहेर पडले आणि अखेर टॉप2 मध्ये अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर राहिले. अखेर बाजी मारत अक्षय केळकर बिग बॉस मराठी 4चा विजेता ठरला आहे.