Top 5ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

वारकरी संप्रदायाची पताका राजधानीपर्यंत नेणारे शिंदे पहिलेच मुख्यमंत्री!

पंढरपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दिल्ली भेटीमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह गृहमंत्री अमित शहा यांना श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट दिल्याने वारकरी संप्रदायमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. आजपर्यंत महाराष्ट्राच्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी राजधानीतील प्रमुख नेत्यांच्या भेटीदरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन महाराष्ट्राची संस्कृती तिथपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला नव्हता.

आजपर्यंत महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी दिल्ली स्थित राष्ट्रीय नेतृत्वांना शिर्डीचे संत साईबाबा किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती दिल्याचे छायाचित्रे अनेकदा दिसून आले , परंतु श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती कधीही कोणी दिली नव्हती. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये जात असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन वारकरी संप्रदायाची महती अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न केला आहे .

ज्याप्रमाणे साईबाबा किंवा तिरुपती बालाजी, जगन्नाथ पुरी या स्थानाबाबत एक प्रकारे प्रचार आणि प्रसार झाला त्याप्रमाणे मराठमोळ्या संस्कृतीचे वैभव असलेल्या आणि आध्यात्मिक राजधानी असलेल्या पंढरपूर आणि श्री विठ्ठल रुक्मिणीचे अशा पद्धतीचे ‘पॉलिटिकल मार्केटिंग’ कधी झाले नाही .

विश्वाच्या तत्त्वज्ञानाचा गाभा ज्या भगवतगीतेमध्ये आहे त्याची माहिती सांगणारी ज्ञानेश्वरी आणि त्यावर आधारलेला हा संप्रदाय खऱ्या अर्थाने व्यापक तत्त्वज्ञानाचा धनी आहे , परंतु ते पोहोचविण्यासाठी मराठी माणूस कमी पडला , ही खंत संप्रदायाला नेहमीच सलत राहिली आहे .

परंतु गेल्या काही वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंढरपूरच्या आषाढी यात्रेच्या कालावधीत एकादशीच्या शुभेच्छा देण्याचा ट्रेंड सुरू केला तसेच पंढरपूरला देखील राजकारणा विरहित अन्य धार्मिक आणि अध्यात्मिक परंपरेच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला .

आज मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे प्रतीक म्हणून श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती दिली . यामुळे संप्रदायाची महती राष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याच्या प्रयत्नांना अधिक गती मिळेल असे मानले जात आहे. याबद्दल वारकरी संप्रदायांमध्ये ही समाधान व्यक्त केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये