ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

महाराष्ट्रातील चिंधीचोर गुंड आदित्य ठाकरे-राऊतांना ताब्यात घ्या; मनसे नेत्याची मागणी

मुंबई : (Amay Khopkar On Aaditya Thackeray) गुरुवार दि. 03 मार्च रोजी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर मॉर्निंग वॉकला गेल्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात संदीप देशपांडे जखमी झाले असून त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. तर देशपांडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आता आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी मनसे नेत्याने केली आहे.

हल्ल्यानंतर संदीप देशपांडे यांना माहिमच्या हिंदुजा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अमित ठाकरे यांच्यासह अनेक नेत्याने देशपांडे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. मनसे नेत्यांकडून हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान माध्यमाशी बोलताना मनसेचे नेते अमेय खोपकर म्हणाले, यांनी मुंबई पोलिसांना नम्र विनंती आहे, महाराष्ट्रातील चिंधीचोर गुंड आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी. संदीप देशपांडे हे मुंबई महानगरपालिकेतील यांचे यांचे भ्रष्टाचार सातत्याने बाहेर काढतायत त्यामुळे हा हल्ला झाल्याचे त्यांनी सांगितले.

खोपकर पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलिसांना विनंती आहे की आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना ताब्यात घ्यावं. त्यांची चौकशी करावी. चौकशीत तथ्य आढळल्यास त्यांना अटक करावी, तसंच मुंबई पोलिसांनी योग्य ती सुरक्षा संदीप देशपांडे यांना पुरवावी, अशी मागणी अमेय खोपकर यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये