ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

वाद पेटणार? “जे पाय ठेऊ न देण्याची भाषा करतात, त्याचा पायच…”, ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपला इशारा

छत्रपती संभाजीनगर : (Ambadas Danve On Chandrashekhar Bawankule) महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेनं जात आहे हा अनेक राजकीय विश्लेकांना पडलेला प्रश्न आहे. कारण विकासावर वाद-विवाद करण्यापेक्षा इतर गोष्टींवर वाद पेटताना दिसत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून अद्यापही रणकंदन सुरुच आहे. राहुल गांधी शिवसेना (Shivsena UBT) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ या निवासस्थानी भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण, राहुल गांधी वीर सावरकरांची माफी मागवी. मगच महाराष्ट्रात पाय ठेवावा, अशा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिला आहे.

“राहुल गांधींनी वीर सावरकरांचा पाचवेळा अपमान केला आहे. आताही राहुल गांधींची भूमिका बदलली नसून, माफी मागितली नाही. ते माफी मागण्याच्या मनस्थितीत नाहीत. उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) भेटण्यापूर्वी राहुल गांधींनी वीर सावरकरांबद्दल केलेल्या सर्व वक्तव्यांची माफी मागावी,” असं चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं.

“वीर सावरकरांची अवहेलना करत इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. एकदा नाही जाणीवपूर्वक पाचवेळा अपमान करण्यात आला. त्यामुळे राहुल गांधींनी महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी वीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांची माफी मागावी. मगच महाराष्ट्रात पाय ठेवावा,” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

यावर आता विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भाष्य केलं आहे. “महाराष्ट्रात कोणी कोणाला येऊ देणार नाही, अशा गोष्टी करू नये. राहुल गांधी काश्मीर-श्रीनगरला जाऊन आले. मग, महाराष्ट्र काय काश्मीर-श्रीनगर आणि पाकिस्तानात नाही. महाराष्ट्रात कोणीही येऊ शकते. त्यामुळे भाजपाने याला येऊ देणार नाही, त्याला देणार नाही, अशी भाषा करू नये. जे पाय ठेऊ न देण्याची भाषा करतात, त्याचा पायच शिल्लक ठेवणार नाही,” अशा शब्दांत अंबादास दानवेंनी अप्रत्यक्षपणे बावनकुळेंना बजावलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये