कॉंग्रेसला मिळणारे नवे अध्यक्ष पक्षाचा कायापालत करतील का? या दिवशी होणार अध्यक्षपदाची निवडणूक

नवी दिल्ली Congress Party Presidential Election : २०१४ च्या निवडणुकीनंतर स्वातंत्र्यपासूनच्या सर्वात मोठ्या राहिलेल्या कॉंग्रेस पक्षाला उतरती कळा लागलेली दिसत आहे.लं अने राज्यांत कॉंग्रेसने आपली सत्ता गमावली आहे. दरम्यान नुकतच गुलाम नबी आझाद यांनी देखील पक्षाला राम राम ठोकला आहे. त्यामुळे पक्षाचा अजूनच आत्मविश्वास खचल्याचं दिसत आहे. दरम्यान लवकरच ऑक्टोबर महिन्यात कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे.
येत्या १७ अक्टोबरला कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. याबाबतची अधिसूचना २२ सप्टेबरला जारी होणार असल्याची माहिती ‘पीटीआय’ने दिली आहे. तर मतमोजणी १९ ऑक्टोबरला होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 24 ते ३० सप्टेंबरदरम्यान राबवण्यात येणार आहे. कॉंग्रेसचे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी ही माहिती दिली.
खासदार राहुल गांधी यांनी कॉंग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारावं अशी विनंती जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. असं त्यांना वैयक्तिकरित्या वाटत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर पक्षातील अनेक नेत्यांना राहुल गांधी अध्यक्षपदी नको असल्याचंही त्यांच्या प्रतिक्रियांवरून दिसत आहे. दरम्यान, नवीन अध्यक्ष कोण असतील? आणि ते पक्षात बदल घडवून आणू शकतील का?, कॉंग्रेसचा कायापालट व्हायला काही मदत होईल का? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.