‘राजकीय सविस्तर चर्चा ते CRCS पोर्टलचे उद्घाटन’, असा असेल अमित शहांचा पुणे दौरा..

Amit Shah Pune Tours : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवार दि. १ ऑगस्ट पुणे दौऱ्यावर आले होते. या गोष्टीला चार दिवस उलटतात न उलटतात तेच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे शहराच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला आधाण आलं आहे. शहा शनिवारी रात्री पुण्यात 40 मिनिटे अधीच पोहोचल्यामुळे नेते मंडळी, कार्यकर्त्ये आणि पोलिस प्रशासनाचा गोंधळ उडाला.
रविवार दि. 6 ऑगस्ट रोजी 12ः00 वाजता अमित शहा यांच्या हस्ते चिंचवड येथे केंद्रीय सरकार संस्था निबंधक (CRCS) कार्यालयाच्या ‘डिजिटल पोर्टल’चे उद्घाटन होणार आहे. देशात 1,550 हून अधिक नोंदणीकृत बहु-राज्य सहकारी संस्था आहेत. त्यांचे कामकाज सुलभ व्हावे म्हणून या पोर्टलची सुरुवात करण्यात आली आहे.
त्यानंतर अमित शहा राज्यातील प्रमुख भाजप नेते आणि घटकपक्षातील नेत्यांशी सविस्तर चर्चा करणार आहेत. त्यासाठी त्यांचे इतर काही कार्यक्रमही टाळण्यात आले आहेत.