ताज्या बातम्यामनोरंजन

ब्लू टिक पुन्हा मिळाल्यानंतर बिग बी झाले खूश; म्हणाले, “ए Musk भैया, तू चीज बडी है…”

मुंबई | Amitabh Bachchan – काल (21 एप्रिल) ट्विटरने जगभरातील दिग्गज मान्यवर, नेतेमंडळी, खेळाडू, सेलिब्रिटी यांना मोठा धक्का दिला. काही दिवसांपूर्वीच एलाॅन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरवरील ब्लू टिकसाठी (Blue Tick) पैसे मोजण्याचा निर्णय जाहीर केला होता. तसंच ज्यांना फ्रिमध्ये ब्लू टिक मिळाली आहे त्यांचीही ब्लू टिक काढण्याचा निर्णय घेतला होता. तर आता याच निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

ट्विटरने केलेल्या या कारवाईमध्ये अनेक नेतेमंडळी, खेळाडू, सेलिब्रिटी यांचा समावेश आहे. यामध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचाही समावेश होता. अमिताभ बच्चन यांची ब्लू टिक हटवल्यानंतर त्यांनी एक मजेशीर असं ट्विट केलं होतं. त्यांनी ट्विट करत म्हटलं की, “ए ट्विटर भैया! ऐकतोय ना? आता तर पैसे पण भरले आम्ही…त्यामुळे ते जे निळं कमळ आहेना, ते आमच्या नावाच्या पुढे पुन्हा लावून दे भैया, जेणेकरून लोकांना कळेल की मीच अमिताभ बच्चन आहे.. हात तर जोडलेत आता काय पाया पडू का?” अमिताभ यांचं हे ट्विट चांगलंच चर्चेत होतं.

अमिताभ बच्चन यांनी केलेल्या ट्विटनंतर त्यांना पुन्हा ब्लू टिक परत मिळाली. ब्लू टिक परत मिळाल्यानंतर अमिताभ यांनी पुन्हा एकदा मिश्किल शैलीत ट्विट केलं आहे. अमिताभ यांचं हे ट्विटही सध्या चांगलच चर्चेत आलं आहे.

अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत म्हटलं की, “ए Musk भैया! मी तुला खूप खूप धन्यवाद देत आहे. ते निळं कमळ माझ्या नावापुढे लावल्याबद्दल. आता तुला काय सांगू भैया! एक गाणं गावसं वाटतंय मला. ऐकायचंय का? ऐक मग.. तू चीज बडी है musk musk.. तू चीज बडी है musk..” असं मजेशीर ट्विट अमिताभ यांनी केलं आहे.

https://twitter.com/SrBachchan/status/1649498422905561088


Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये