ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

जयदत्त क्षीरसागर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी? जिल्हाध्यक्ष अनिल जगताप यांची माहिती

बीड : (Anil Jagtap On Jaidatta kshirsagar) गेल्या काही दिवसांपासून बीडमधील शिवसेनेचे नेते जयदत्त क्षीरसागर हे भाजपमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दोनच दिवसापूर्वी नगरोत्थान अभियानांतर्गत बीडमधील सिमेंट रस्ता आणि नालीच्या ७० कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. यावेळी जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थिती लावली होती.

कार्यक्रमावेळी उद्धव ठाकरेंचा किंवा शिवसेनेचा त्यांनी कुठेही उल्लेख केला नाही. त्यांच्यावरील कारवाईसाठी हे तात्कालिक कारण ठरल्याचं बोललं जात आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरही शिवसेनेतील ठाकरे गटाशी कोणताही संबंध असल्याचा उल्लेख ठेवलेला नाही.

या पार्श्वभूमीवर आज बीडमधील ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल जगताप यांनी माध्यमांशी बोलताना केलेल्या वक्तव्यांमुळे जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेनेतून रीतसर हकालपट्टी झाल्याचं समोर येत आहे. क्षीरसागर यांनी मधल्या काळात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाविषयी अनेकदा उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे.

बीडचे जिल्हाध्यक्ष अनिल जगताप यांनी माध्यमांशी बोलताना जयदीप क्षीरसागर यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे संकेत दिले आहेत. “क्षीरसागर यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही हे आमच्या तोंडून सांगणं हे आमचं भाग्य आहे. वर्षानुवर्षं आम्ही ज्या क्षीरसागर यांना विरोध करत होतो, त्यांना शिवसेनेतून बाजूला सारल्याचं जाहीर करण्याची वेळ आमच्यावर आली”, असं अनिल जगताप यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये