Top 5ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्रमुंबईशिक्षण

अजब कारभार! इंग्रजीनंतर आता हिंदीच्या प्रश्नपत्रिकेतही चुका; विद्यार्थी हैराण

मुंबई : HSC Exams : विभागीय शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्नांमध्ये चूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली आहे. अशातच बुधवारी झालेल्या हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतही चुका झाल्याचे समोर आले आहे. दोन प्रश्नांमध्ये चुकीचे क्रमांक देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा चांगलाच गोंधळ उडाला आहे.

बारावी बोर्डाच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरूवात झाली आहे. यावर्षी कॉपीमुक्त अभियानांतर्गत परीक्षेदरम्यानचे गैरप्रकार टाळण्यासाठी सरकारने काटेकोर उपाययोजना केल्या आहेत. परंतुृ काॅपी व्यतिरिक्त अन्य चुका समोर येताना दिसत आहेत. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्न चुकल्याचे समोर आले. प्रश्नपत्रिकेतील ए ३ आणि ए ५ या प्रश्नांसाठी केवळ सूचना नमूद केलेल्या होत्या, तर ए ४ या प्रश्नात प्रश्नाऐवजी थेट उत्तरच देण्यात आले होते. त्यामुळे या तीन प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला. असाच प्रकार बुधवारी झालेल्या हिंदीच्या पेपरमध्ये ही झाल्याचे समोर आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये