Top 5ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

सत्तानाट्यात मोठा ट्विस्ट, मुख्यमंत्र्यांच्या लाईव्हनंतर एकनाथ शिंदेंचं आणखी एक ट्विट!

मुंबई – Eknath Shinde Twit | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करत त्यांनी आपली भावना बोलून दाखवली. यामध्ये त्यांनी सर्व आमदारांना माघारी येण्याचं आवाहन केलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्हनंतर एकनाथ शिंदे यांनी आणखी एक ट्विट केलं आहे.

गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच, पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक आणि महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचं असल्याचंही शिंदे म्हणाले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांचं ट्विट पाहता त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत राहायचं नसल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. त्यासोबतच त्यांनी या सरकारला अनैसर्गिक आघाडी असं म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये