ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“आनंद दिघेंनी गद्दारी झाल्यानंतर ठाण्यात…,” सावंतांनी करुन दिली शिंदे गटाला ‘ती’ आठवण!

मुंबई : (Arvind Sawant On Eknath Shinde) स्वर्गीय आनंद दिघेंनी गद्दारी झाल्यानंतर ठाण्यात काय केलं होतं हे आठवतं का? अशी आठवण शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटाला करुन दिली आहे. उद्धव ठाकरे या महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख ठरले. त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात दंगली झाल्या नाहीत याचीच भाजपाला सल आहे असा आरोपही त्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी केला.

दरम्यान अरविंद सावंत म्हणाले, “शिंदे तुमच्यावरील ईडी, सीबीआयच्या केसेस, खुनाचा आरोपाचं काय झालं ते त्यांनी आधी सांगावं आणि नंतर आपण बाळासाहेबांचे समर्थक आहोत म्हणावं. ज्या आनंद दिघेंचं ते नाव घेतात त्यांनी ठाण्यात गद्दारी झाल्यानंतर काय केलं होतं आठवतं का? त्यांनी सर्व नगरसेवकांचे राजीनामे घेतले होते. पाच वर्ष ठाण्यात विरोधी पक्षच नव्हता. एकाने गुन्हा केला म्हणून सर्वांना शिक्षा दिली होती, आज आनंद दिघे असते तर यांच काय झालं असतं विचार करा”? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना सावंत म्हणाले, “न्यायालयीन व्यवस्था अजून निर्णय घेत नाही, पोलीसदेखील एकाच बाजूने वागत आहेत. कायदा सुव्यवस्थेची काळजी असेल तर कालपर्यंत ज्यांनी हात पाय तोडेन अशा वल्गना केल्या त्यांच्यावर काय कारवाया केल्या याचं उत्तरही दिलं पाहिजे. त्यासाठीच आम्ही राज्यपालांना भेटलो होतो. राज्य कुठे चाललं आहे? गृहमंत्र्याचं आदेशावरुनच हे सर्व सुरु आहे. म्हणूनच दिल्लीतही हातात कागद घेऊन बोलावं लागतं,” अशी टीकाही अरविंद सावंत यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये