ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“सकाळी उठून बोलघेवडेपणा करायचा अन्…”, आशिष शेलारांचा संजय राऊतांवर घणाघात

मुंबई | Ashish Shelar On Sanjay Raut – दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून (Disha Salian Case) राज्याच्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. या प्रकरणी सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंवर (Aaditya Thackeray) गंभीर आरोप केले आहेत. तसंच या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यासाठी SIT अर्थात विशेष तपास पथक स्थापन करण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. यादरम्यान, आज (24 डिसेंबर) शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर (Shinde Government) हल्लाबोल केला आहे.

“गरिबांना रेशन देण्यासंदर्भात केंद्र सरकारनं नवीन रेशनची पाॅलिसी जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारनं एसआयटीचं रेशन केलं आहे. मागेल त्याला एसआयटी. ज्या पद्धतीनं 50 खोके देऊन महाराष्ट्रातले 40 आमदार फोडण्यात आले, तो नक्की काय व्यवहार होता, त्यावरही एक एसआयटी स्थापन व्हायला हवी. मात्र, जे विषय पोलीस, सीबीआयनं संपवले आहेत त्यावर एसआयटी स्थापन करून तुम्ही सत्तेचा गैरवापर करत आहात. पण तरीही आम्ही सगळ्या तपासांना सामोरे जायला तयार आहोत. त्यामुळे तुम्ही तोंडावर पडाल”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. आत राऊतांच्या या टीकेला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

“सत्य बोलायची ज्यांच्या तोंडात सवय नाही. जे रोज सकाळी उठून रामरक्षा म्हणायच्या ऐवजी रावणरक्षा म्हणतात, त्यांचं नाव म्हणजे संजय राऊत. रोज सकाळी उठलं की रावणरक्षा म्हणत राहायची. तुम्ही गेल्या अडीच वर्षांमध्ये गोरगरिब जनतेसाठी केलेलं एक काम सांगा. सकाळी उठायचं बोलघेवडेपणा करायचा आणि आम्हाला विचारता आम्ही कुठे आहोत?”, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

पुढे ते म्हणाले, “देशभर मोदीजींनी घेतलेल्या निर्णयांची चर्चा आहे. 81 कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचा निर्णय पुन्हा घेण्यात आला आहे. 107 औषधांच्या किंमती नियंत्रणात आणून सामान्य माणसांना दिलासा दिला गेला आहे. सरंक्षण खात्यातील 25 लाख अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला 23 हजार कोटींच्या वन रँक, वन पेन्शन योजनेचा लाभ मिळत आहे. पंतप्रधानांनी गरिबांची सेवा, सैनिकांची सेवा अशी कामं केली आहेत. त्यामुळे संजय राऊत तुम्ही बोलघेवडेपणा बंद करा… रामरक्षा म्हणा, रावणरक्षा म्हणणं बंद करा”, असा सल्लाही आशिष शेलारांनी संजय राऊतांना दिला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये