क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

भारताने नाणेफेक जिंकली, सामना जिंकणार? फायनचं तिकीट कोणाला.. टीम इंडियाची दमदार सुरुवात

Asia Cup India vs Sri Lanka 2023 : आशिया कप 2023 च्या सुपर फोरमध्ये पाकिस्तानविरुद्ध मोठा विजय मिळवल्यानंतर आता टीम इंडियाचा सामना श्रीलंकेशी होत आहे. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवरही हा सामना खेळवला जात आहे.

हे तेच मैदान आहे जिथे पावसामुळे भारत-पाकिस्तान सामना राखीव दिवसात हलवण्यात आला होता. मात्र, खराब हवामानाचा परिणाम भारत-श्रीलंका सामन्यावरही दिसून येईल. भारताने श्रीलंकेविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

भारताच्या सलामीच्या कर्णधार रोहित शर्मा-शुभमन गिल जोडीने दमदार सुरुवात केली आहे. दोन्ही फलंदाज चांगल्या फार्ममध्ये दिसून येत आहेत. सहा षटकांचा खेळ झााला असून, भारताने नाबाद 31 धावा रचल्या आहेत. यामध्ये रोहित शर्माने 22 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने 17 धावा तर शुभमन गिलने 13 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 14 धावा केल्या आहेत. त्यामुळे सध्या भारताची या सामन्यात आघाडी पाहायला मिळत आहे. भारताने नाणेफेक तर जिंकली पण, सामना ही जिंकणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये