75 वेदशास्त्रींच्या उपस्थितीत पंढरीत अतिरुद्र स्वाहाकार यज्ञ

अमेरिकेहून भारतीय वंशाचे वेदमूर्ती संदीप शास्त्री कापसे यांची उपस्थिती
पंढरपूर | पुरुषोत्तम अधिकमासानिमित्त सध्या पंढरपुरात (Pandharpur) विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. अशातच पंढरपूर नजीक असणाऱ्या कोर्टी या ठिकाणी अति रूद्र स्वाहाकार यज्ञ होत आहे. यासाठी विविध भागातून 75 वेदशास्त्र संपन्न पुरोहित उपस्थित झाले आहेत.
या यज्ञासाठी थेट अमेरिका येथून भारतीय वंशाचे वेदमूर्ती संदीप शास्त्री कापसे हे पंढरपुरात आले आहेत. नारद मुनींनी पुराणकाळात कोटी यज्ञ केला होता, त्यावरून पंढरपूर जवळ असणारे एका गावात कोर्टी हे नाव पडले. त्याच कोर्टी गावांमध्ये सध्या लोककल्याणासाठी माजी पोलीस उपअधीक्षक संजय ताठे यांच्या शेतात वेदाचार्य माधव पाटील ( यतनाळकर) यांच्या नियोजनाखाली व वेदाचार्य मंदार जोशी गुरुजी आणि वेदाचार्य जगन्नाथ पाटील ( यतनाळकर) यांच्या सहकार्याने यज्ञ होत आहे.
९० च्या दशकात राम मंदिर हा विषय गाजला होता आणि पंढरपूर मधील हिंदुत्ववादी संघटनांनी कारसेवक म्हणून संदीप शास्त्री यांनी सहभाग घेतला होता. हिंदू महासभेचा कार्यकर्ता म्हणून संदिप कापसे यांनी सहभाग घेतला होता आणि तुरुंगवास भोगला होता. पण नंतर संदीप कापसे गुरूजींनी वेदांचा अभ्यास करून थेट अमेरिका गाठली आणि वेदांचा प्रसार सुरू केला. तब्बल २२ वर्षांनंतर दुर्मिळ अशा यज्ञासाठी ते स्वगृही आले असून यज्ञविधी मध्ये ब्रम्हा हे कार्य करत आहेत. येणाऱ्या काही दिवसात अयोध्येत राममंदिर निर्माण होत असून त्यामध्ये कारसेवक म्हणून सहभाग घेतलेले संदिप कापसे गुरूजी दुर्मिळ अशा यज्ञाचे पौरोहित्य करत आहेत.