देश - विदेश

औरंगाबाद- पाणीप्रश्नावरुन भाजपची आक्रमक भुमिका

औरंगबाद : सध्या शहरातील पाणी प्रश्न गंभीर बनला आहे, यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून पाणीटंचाईविरोधात रस्त्यावर उतरत जलआक्रोश मोर्चा काढण्यात आला, ज्यामध्ये हजारोच्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतला. यादरम्यान बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, या मोर्चाचं टोक दिसत नाहीये हा संभाजीनगरच्या जनतेचा आक्रोश आहे. सरकार आणि महानगरपालिकेतील शिवसेनेनं आश्वासनं दिली. भावनेचं राजकरण केलं पण थेंबभर पाणी देऊ शकले नाहीत. या आक्रेशाचा सामना सरकारला करावा लागेल, संभाजीनगरला पाणी मिळाल्याशिवाय आमचा संघर्ष संपणार नाही असं ही ते म्हणाले.

दरम्यान, खासदार इम्तियाज जलील हे टिका करताना म्हणाले, हे फक्त नाटक करण्यासाठी येत आले आहेत. त्यावर बोलताना फडणवीसांनी उत्तर दिलं, जनतेसाठी संघर्ष करणं माहीत नाही, त्यांनी तिथं बसून बोलू नये, आणि तेच नौटंकी करत असल्याचं म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये