शिक्षण

विद्यार्थ्यांवरील प्रेमच बनवते तुम्हाला एक उत्तम शिक्षक; गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकरांंचा कानमंत्र

पुणे : तुम्ही शिकवत असलेल्या विषयावर आणि तुमच्या विद्यार्थ्यांवर तुमचे प्रेम असेल, तर कोणत्याही विषयात तुम्ही उत्तम शिक्षक बनू शकता. त्यामुळे विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या पद्धतीने विषय शिकवावा, असा कानमंत्र भारतीय मराठी गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांनी दिल.

मंगला नारळीकर पन्नास वर्षे समर्पित वृत्तीने गणित हा विषय शिकवीत आहेत. त्यांनी शिक्षक म्हणून हजारो स्कॉलर्स निर्माण केले. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांतून प्रेरणा घेऊन अनेकांनी गणितात मोठे काम केले आहे.

_ प्रा. डॉ. संजय चोरडिया, सूर्यदत्ता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष

सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने आर्यभट्ट जयंतीनिमित्त बावधन कॅम्पसमध्ये आर्यभट्ट हॉलचे उद्घाटन डॉ. मंगला नारळीकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. आर्यभट्ट जयंतीनिमित्ताने आयोजित या कार्यक्रमावेळी सूर्यदत्ता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा डॉ. सुषमा चोरडिया, सहायक उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, संचालक प्रशांत पितालिया आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. नारळीकर यांना ‘सूर्यदत्ता आर्यभट्ट पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

आर्यभट्ट हे प्राचीन काळातील महान गणिती व खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनी जगाला दिलेल्या शून्याच्या योगदानामुळे गणित या शास्त्राचे संपूर्ण स्वरूप बदलून गेले. त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये