ताज्या बातम्यामनोरंजन

‘आप’च्या खासदारानंतर परिणीती चोप्रा-राघव चड्ढांना या प्रसिद्ध गायकानं दिल्या शुभेच्छा, म्हणाला…

मुंबई | Parineeti Chopra-Raghav Chadha – बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्या डेटींगच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. तसंच आता त्या दोघांच्या लग्नाच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीत आपचे खासदार संजीव अरोरा (Sanjeev Arora) यांनी ट्विट करत परिणीत आणि राघव यांच्या नात्याबाबत शिक्कामोर्तब केलं होतं. तर आता प्रसिद्ध गायक हार्डी संधूनेही (Harrdy Sandhu) या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हार्डीनं डीएनएला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “परिणीत ही तिच्या आयुष्यात स्थिरावत आसल्याचा मला आनंद आहे. त्यांना मी शुभेच्छा देतो. जेव्हा मी 2022 च्या स्पाय-थ्रिलर ‘कोड नेम तिरंगा’ चे शूटींग करत होतो तेव्हा माझी परिणीतीसोबत लग्नाबद्दल चर्चा झाली होती. त्यावळी तिनं मला सांगितलं होतं की, जेव्हा मला योग्य व्यक्ती मिळाले तेव्हाच मी लग्न करेन.”

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच परिणीतीचा एक व्हिडीओ समोर आला होता. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये परिणीती बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरी जाताना दिसली. त्यामुळे आता तिच्या लग्नाची तयारी सुरु झाल्याची चर्चा चाहत्यांमध्ये सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये