ताज्या बातम्यारणधुमाळी

“‘लाव रे तो व्हिडीओ’वाले राज ठाकरे खरे होते आता मात्र ते…”, बाळासाहेब थोरात यांचा टोला

मुंबई | Balasaheb Thorat On Raj Thackeray – काँग्रेस विधीमंडळ नेते आणि आमदार बाळासाहेब थोरात यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “आम्ही पूर्वी ‘लाव रे तो व्हिडीओ’वाले राज ठाकरे पाहिले ते खरे राज ठाकरे होते. आता मात्र ते वेगळ्या दिशेने चाललेले दिसत आहेत,” असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. ते आज (31ऑगस्ट) नवी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले, “राज ठाकरे यांची वाटचाल कशी चालली आहे हे आपण पाहत आलो आहोत. आम्ही पूर्वी ‘लाव रे तो व्हिडीओ’वाले जे राज ठाकरे पाहिले ते खरे राज ठाकरे होते. आता मात्र ते वेगळ्या दिशेने चाललेले दिसत आहेत”.

“गेल्या २४ तासात भाजपाचे तीन मोठे नेते राज ठाकरेंना भेटले. त्यामुळे यातून भाजपसोबत युती होण्याचे काही संकेत मिळत आहेत,” असं देखील बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. पुढे त्यांनी रामदेव बाबांच्या वक्तव्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, रामदेव बाबा मुख्यमंत्र्यांना भेटून बोलले की, एकनाथ शिंदे हिंदू धर्माचे सर्वात मोठे मुख्यमंत्री आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका धर्माचे कसे होऊ शकतात. लोकशाहीने, आपल्या घटनेनं सर्वधर्मसमभाव हे सूत्र ठेवलं आहे. मुख्यमंत्री सर्वांचेच असतात. मी कोणत्याही एका धर्मापेक्षा सर्वांचा आहे, हे म्हणणं फार महत्त्वाचं आहे. किमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ही अपेक्षा आहे,” असं देखील थोरातांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये