ताज्या बातम्यामनोरंजन

शिव ठाकरेच्या घरी वर्दीतला बाप्पा; पोलिसांच्या हस्ते केलं गणरायाचं दणक्यात आगमन

मुंबई | Shiv Thakare – ‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरे (Shiv Thakare) हा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. त्याचा चाहता वर्गही लाखोंच्या संख्येत आहे. तो सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. तो त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. तर आता शिव ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण शिवच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. त्याच्या घरी वर्दीतल्या बाप्पाचं आगमन झालं असून त्यानं पोलिसांच्या हस्ते गणरायाचं दणक्यात आगमन केलं आहे.

सध्या सोशल मीडियावर शिवचे बाप्पासोबतचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडोओमध्ये शिव वर्दीत असलेल्या गणपती बाप्पांचं धूमधडाक्यात स्वागत करताना दिसत आहे. बाप्पाच्या आगमनादरम्यान पोलीस देखील सहभागी झाले होते.

https://www.instagram.com/p/CxUR3olq81i/?utm_source=ig_web_copy_link

शिवनं त्याच्या घरी पोलिसांचा गणवेश परिधान केलेला गणपती बाप्पा घरी आणला आहे. विशेष म्हणजे त्यानं वर्दीतले बाप्पा घरी आणताना रात्रंदिवस सेवेत तत्पर असणाऱ्या पोलिसांना मानवंदना दिली. तर आता शिवचे बाप्पासोबत फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये