ताज्या बातम्यामनोरंजन

‘आलंय माझ्या राशीला’ असं का म्हणतोय चिन्मय मांडलेकर? पाहा चित्रपटाचा धमाकेदार टीझर

मुंबई | Chinmay Mandlekar – सध्या प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) ‘आलंय माझ्या राशीला’ (Aalay Mazya Rashila) असं म्हणतोय. तो असं का म्हणतोय? हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 10 फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या आनंदी वास्तू आणि साईकमल प्रोडक्शन निर्मित ‘आलंय माझ्या राशीला’ या मराठी चित्रपटातून मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीझर (Teaser) प्रदर्शित झाला आहे. तसेच हा टीझर अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

‘आलंय माझ्या राशीला’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अजित शिरोळे यांनी केलं आहे. तसंच सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आणि अश्विनी पिंपळकर चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर मध्यवर्ती भूमिकेत असून विविध राशींच्या गमतीजमती त्यांची वैशिष्ट्य आपल्याला या चित्रपटातून जाणून घेता येणार आहेत. प्रत्येक राशींची काही स्वभाववैशिष्टये, सौंदर्य आहेत. याच सौंदर्याची गंमत दाखविणारा, राशींच्या उत्सुकतेला अभ्यासाच्या आणि विज्ञानाच्या आधारे जोडणारा हा चित्रपट आहे.

या चित्रपटात चिन्मय मांडलेकरसोबत अलका कुबल, मोहन जोशी, निर्मिती सावंत, प्रसाद ओक, अतुल परचुरे, मंगेश देसाई, उषा नाईक, भार्गवी चिरमुले, अश्विनी कुलकर्णी, स्वप्निल राजशेखर‌, पौर्णिमा अहिरे, दिगंबर नाईक, संग्राम चौगुले, सिद्धार्थ खिरीड या कलाकारांच्या दमदार भूमिका आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये