ISRO नं दिली Good News, आता चंद्रावर घेता येणार श्वास; मिळाले ऑक्सिजन असल्याचे पुरावे

Chandrayaan-3 | भारताची चांद्रयान-3 (Chandrayaan-3) मोहिम यशस्वी झाल्यानंतर आता इस्त्रोनं (ISRO) आणखी एक गुड न्यूज दिली आहे. आता चंद्रावर श्वास घेता येणार आहे. कारण चांद्रयानच्या प्रज्ञान रोव्हरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजन, सल्फर, लोह, अॅल्युमिनियम, कॅल्शियम, क्रोमियम, टायटॅनियम, मँगनीज, सिलिकॉन आढळले आहे.
इस्त्रोनं ट्विट करत म्हटलं आहे की, पहिल्यांदाच रोव्हरवर लावलेल्या लेझर ब्रेकडाऊन स्पक्ट्रोस्कोपनं दक्षिण ध्रुवाकडील चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर घटक असल्याची पुष्टी केली आहे. तसंच तिथे AI, Ca, Fe, Cr, Ti, Mn, Si आणि O (ऑक्सिजन) आढळले आहे. तर आता चंद्राच्या पृष्ठभागावर हायड्रोजनचा शोध सुरू आहे.
तसंच इस्त्रोनं ट्विटरवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये इस्त्रोनं लिहिलं आहे की, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर वैज्ञानिक शोध सुरू आहे. प्रज्ञान रोव्हरवरील लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप इन्स्ट्रुमेंटद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर असल्याचे पुरावे आढळले आहेत.