पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा मोठा निर्णय…

चंदीगढ : पंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते भगवंत सिंग माण यांच्या सरकारने मोठा निर्णय घेत राज्यातील तब्बल १८४ लोकांची व्हीआयपी सुरक्षा काढून घेतली आहे. सुरक्षा काढून घेतलेल्या लोकांमध्ये मंत्री, आमदार आणि काही खासगी लोकांचा सामावेश आहे. सुरक्षा काढण्याचे आदेश २० एप्रिलला दिले होते. त्यांच्या सुरक्षेचा काळ संपल्यामुळे ही सुरक्षा काढण्यात येत असल्याची माहिती पोलिस सुरक्षा महासंचालकांनी सांगितलं. त्यांना सरकारची सुरक्षा पुरवण्यात आलेली होती.
184 व्हीआयपी लोकांपैकी माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, गुरुदर्शन ब्रार, आयपीएस गुरुदर्शन सिंग, उदयबीर सिंग (माजी मंत्री सुखजिंदर सिंग यांचा मुलगा) यांचे कुटुंबिय, मा. मंत्री सुरजितसिंग राखरा, बिबी जागीर कौर, तोता सिंग, कॉंग्रेसचे मा. खासदार विरेंदर सिंग बाजवा, संतोष चौधरी, कॉंग्रेसचे मा. आमदार दीप मल्होत्रा भाजपा राज्य उपाध्यक्ष राजेश बग्गा, भाजपाचे स्टार प्रचारक माही गिल आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरिंगर सिंग कोहली यांचीसुद्धा सुरक्षा काढण्यात आली आहे.