पुण्यात होणार दंगल.?

पुणे Brijbhushan Singh In Pune : उत्तर भारतीयांची माफी मागण्याची मागणी भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह (BJP Brijbhushan Sinh) यांनी केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Tackerey MNS) यांचा दौरा त्यावेळी पाठीच्या कारणामुळे रद्द झाला आणि ती मागणी मागे पडली. मनसेनेला आव्हान देणारे ब्रिजभूषण सिंह पुणे दौऱ्यावर (Brijbhushan Singh In Pune) येत असून त्यांना मनसे विरोध करणार की, संयमाची भूमिका घेणार, अशी चर्चा सुरू असताना मनसेने दमादमाने घेण्याचे धोरण सध्या तरी अवलंबले आहे. त्यामुळे पुण्यात या दोघांची दंगल होणार का, याची उत्सुकता आहे.
ब्रिजभूषण सिंह कुस्ती फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत. पुण्यात २० ते २५ डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पर्धा भरविली आहे. त्यासाठी ब्रिजभूषण सिंह पुण्यात येणार आहेत. पुण्याच्या त्यांचा दौऱ्याला मनसेकडून विरोध होणार, असा कयास होता. मात्र, असे काही होईल, असे दिसत नाही. मनसेने आपल्या भूमिकेला मुरड का घातली, हे उत्सुकतेचे आहे. राज ठाकरे यांनी बुधवारी कोणीही कोणत्याही विषयावर प्रतििक्रया व्यक्त करू नये, अशा सूचना दिल्या आहेत.
उत्तर भारतीयांच्या संदर्भात राज ठाकरेंच्या भूमिकेवर भाजपचे ब्रिजभूषण सिंह नाराज होते. तसेच ब्रिजभूषण सिंह आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे चांगले संबंध असल्यने राज ठाकरे यांच्या विरोधात शरद पवार यांनी सिंग यांना उभे केल्याची चर्चा मनसेने केली होती. सिंग यांच्यासोबत कार्यक्रमातले सुप्रिया सुळे तसेच शरद पवार यांचे छायाचित्र तसेच चित्रफिती समाज माध्यामांवर त्यावेळी पसरवण्यात आल्या होत्या.