ताज्या बातम्यामनोरंजन

वयाच्या पन्नाशीनंतरही ‘या’ अभिनेत्री आहेत रूपाची खाण, त्यांचा बोल्डनेस पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

बॉलिवूडच्या अभिनेत्रींनी (Bollywood Actress) त्यांच्या सौंदर्यानं चाहत्यांना भुरळ घातली आहे. बॉलिवूडच्या सौदर्यवतींचं रूप पाहून आजची तरूणाई घायाळ होताना दिसते. मग दीपिका पदुकोण असो, कॅटरिना कैफ असो, राणी मुखर्जी असो, काजोल असो अशा अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या सौंदर्यानं तरूणाईला अगदी वेडं केलं आहे. आजच्या या अभिनेत्रींसोबतच अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी वयाची पन्नाशी पार केली असूनही त्या अजुनही बोल्ड आणि सुंदर आहेत. या ज्येष्ठ अभिनेत्रींनी त्यांच्या सौंदर्यानं आणि बोल्डनेसनं आजच्या तरुण अभिनेत्रींना मागे टाकलं आहे. तर आता आपण काही अशाच अभिनेत्रींबाबत जाणून घेणार आहोत ज्या वयाच्या पन्नाशीनंतरही रूपाची खाण आहेत.

1. भाग्यश्री (Bhagyashree) – एकेकाळी ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातील भाग्यश्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं होतं. आज भाग्यश्री यांनी पन्नाशीचा आकडा पार केला आहे पण त्यांचं सौंदर्य अजूनही कमी झालेलं नाहीये. आजही त्या तितक्याच बोल्ड, डॅशिंग आणि सुंदर दिसतात. त्यांच्या स्टाईलनं आजच्या तरूणाईला चांगलंच वेड लावलं आहे. भाग्यश्री यांनी त्यांच्या सौंदर्यांन आत्ताच्या तरूण अभिनेत्रींनाही मागे टाकलं आहे.

image 2 15

2. करिष्मा कपूर (Karishma Kapoor) – अभिनेत्री करिष्मा कपूर ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. करिष्मा कपूर आजही तितकीच बोल्ड आणि हॉट आहे. तिचा स्टाईलींग लूक पाहून आजची तरूणाई घायाळ होताना दिसते. यामध्ये मग साडी असो, वेस्टर्न ड्रेस असो करिष्मा कपूरशी आजही कोणी स्पर्धा करू शकत नाही. तिनं तिच्या सौंदर्यानं चाहत्यांना अगदी वेड लावलं आहे. तिचे डोळे पाहून तर आजची तरूणाई तिच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही.

image 2 14

3. नीना गुप्ता (Nina Gupta) – बोल्डनेसच्या बाबतीत आजच्या तरूण अभिनेत्रींना मागे टाकलं ते ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी. आजच्या अभिनेत्री लाजवेल असा त्यांचा बोल्डनेस आहे. वयाच्या 64 वर्षीही त्या एकदम स्टायलिश आणि हॉट दिसतात. त्या या वयातही बिनधास्तपणे वेस्टर्न शॉर्ट कपडे घालताना दिसतात. आजच्या अभिनेत्रींसाठी त्या खरंच प्रेरणादायी आहेत. बॉलिवूडमधल्या त्या एक रूपाची खाणच आहेत.

image 2 13

4. रेखा (Rekha) – ज्येष्ठ अभिनेत्री रेखा या एक सौंदर्यवती आहेत. रेखा यांनी त्यांच्या सौंदर्यानं चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यांची अदाकारी पाहून आजही चाहते घायाळ होताना दिसतात. साडीत तर त्यांचं रूप अगदी खुलून दिसतं. रेखा यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमी आतुर असतात.  

image 2 12

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये