भरमंडपात नवरी ‘पतली कमरीया’वर थिरकली अन्…, व्हिडीओ पाहून सर्वांच्याच भुवया उंचावतील
मुंबई | Bridal Dance Video Viral – सध्या सोशल मीडियावर ‘पतली कमरीया मोरी’ (Patali Kamariya Mori Song) गाण्यानं अनेकांना वेड लावलं आहे. या गाण्यावर अनेकजण थिरकताना दिसत आहेत. तसंच त्यांचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच एका शाळेतील वर्गातही शिक्षिका विद्यार्थ्यांसोबत या गाण्यावर भन्नाट डान्स (Dance) करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तर आजची तरूणाई देखील या भोजपूरी गाण्यावर रील बनवताना दिसत आहे. आशातच आता भर लग्नमंडपात एका नवरीला (Bridal) पतली कमरीयावर (Patali Kamariya) नाचण्याचा मोह काही आवरला नाही. तिनं चक्क भरमंडपात वऱ्हाड्यांसमोरच जबरदस्त ठुमके लगावल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
एका लग्नसोहळ्यात डीजेवर पतली कमरीया (Patali Kamariya) गाणं सुरु होताच नवरीनं ठुमके मारायला सुरुवात केल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. या गाण्यावर नवरी स्टेजवर डान्स करत असतानाचा तिच्यासोबत असलेले मित्र मंडळीही या गाण्यातवर थिरकताना दिसत आहे. विशेष म्हणजे सासरच्या मंडळींसमोर नवरीनं पतली कमरीया गाण्यावर डान्स केल्यानं (Bridal Dance On Patali kamariya Song) सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यावर नेटकऱ्यांनीही भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. तसंच हा व्हिडीओ @meerakumawat2 नावाच्या युजरनं इन्स्टाग्रामवर शेअर केला असून या व्हिडीओला 11 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे.
दरम्यान, काही तरूणींनी देखील पतली कमरीया मोरी गाण्यावर भन्नाट डान्स करून रील्स बनवत सोशल मीडियावर व्हायरल केले होते. तसंच या गाण्यावर बनवलेल्या रील्सला इंटरनेटवर नेटकऱ्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.