ताज्या बातम्यापुणे

अनधिकृत बांधकाम धारकावर दाखल होणार गुन्हे

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) हिंजवडी (ता. मुळशी) आण‍ि मांजरी (ता. हवेली) भागातील अनधिकृत बांधकाम धारकावर गुन्हे नोंदव‍िण्यात आले आहे. तत्पुर्वी संबंध‍ितांना अनधिकृत बांधकाम थांबव‍िण्याबाबत नोटीस बजावली होती. पण त्या नोटीसचे पालन न केल्याने शेवटी दोघांवर पीएमआरडीएकडून गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आली.

हिंजवडी येथील एका अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विरोधात हिंजवडी पोलीस स्टेशन तर मांजरी अनधिकृत बांधकाम करणाऱ्या महिलेविरोधात हडपसर ठाण्यात गुन्हा दाखल केला. संबंध‍ित बांधकामधारकांना पीएमआरडीएकडून वेळोवेळी अनधिकृत बांधकाम थांबविणेसाठी नोटीसद्वारे कळवले होते. पण, बांधकामधारक यांनी प्राधिकरणाच्या नोटीसचे अनुपालन न केल्याने त्यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ कलम ५४(२) अन्वये हिंजवडी आण‍ि हडपसर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा- एमआयटी युनिव्हर्सिटीतर्फे १० व्या जागतिक विज्ञान, धर्म-अध्यात्म आणि तत्त्वज्ञान संसदेचे आयोजन

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील मालमत्ताधरकांनी परवानगी घेवूनच आपली बांधकामे करावीत, असे आवाहन करण्यात येत आहे. यासह सुरू असलेली अनधिकृत बांधकामे तत्काळ थांबवावीत. अन्यथा, संबंध‍ितांवर उक्त नियमाप्रमाणे कारवाई करणार असल्याचे पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागाच्या उपजिल्हाधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा- मंडई मेट्रो नाही महात्मा फुले मंडई मेट्रो असे नाव देणे बाबत माळी महासंघाचे आंदोलन

शिक्षेची तरतूद…
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५४ नुसार अनधिकृत बांधकाम धारकास अनधिकृत बांधकाम थांबविण्याची नोटीस दिल्यानंतर सदर बांधकाम न थांबविल्यास तीन वर्षांपर्यंतची शिक्षा किंवा पाच हजार रुपये दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये