पोलिसांचा तिरंगा रॅलीमध्ये सहभाग

पुणे : भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या उपक्रमाच्या अंतर्गत बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासमवेत सुखसागर भागात हर घर तिरंगा या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीसाठी बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे आणि गुन्हे विभागाच्या पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर व बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.
या रॅलीमध्ये जे दुगड ट्रस्ट, त्याचबरोबर जडाबाई दुगड शिक्षण संकुल यांच्या अंतर्गत येणाऱ्या पुष्पा इंटरनॅशनल स्कूल, हिरामण बनकर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, एल. एस. इंग्लिश स्कूल या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी संस्थेचे सचिव मोनल दुगड, प्राचार्य हरिश्चंद्र गायकवाड, काकासाहेब राजपुरे, नंदा भोसले, सविता पायगुडे, प्रा. जितेंद्र देवकर व इतर सर्व शिक्षक उपस्थित होते.