Top 5ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरणधुमाळी
देवेंद्र फडणवीसांची यशस्वी खेळी, धनंजय महाडिक विजयी!

मुंबई – Rajya Sabha Election Dhananjay Mahadik | राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपला महाविकास आघाडीची 9 ते 10 मते फोडण्यात यश आलं. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी खेळलेल्या खेळीला यश आलं असून भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे.
पहिल्या फेरीत संजय पवार यांना 33 मतं मिळाली होती. तर, धनंजय महाडिक यांना 27 मतं मिळाली आहेत. मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे धनंजय महाडिक यांचा विजय झाला.
दरम्यान, पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांना 48 मतं मिळाली. तर, शिवसेनेचे संजय राऊत यांना 41, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल यांना 43 तर काँग्रेसचे इमरान प्रतापगढी यांना 44 मतं मिळाली आहेत.