भगव्या बिकिनीच्या वादात असूनही पठाण चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद

मुंबई | बहुचर्चित पठाण (Pathan) सिनेमा आज अखेर रिलीज झाला आहे. शाहरुखच्या (Shahrukh Khan) चाहत्यांनी पठाणचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी केली आहे. चाहत्यांनी पठाणला (Pathan) पसंती दिल्याचे दिसून येत आहे. 4.19 लाखांचं अँडवान्स बुकींग्स देशातील थिएटर्स हाऊसफुल्ल झालेत. मुंबईसह (Mumbai) पुण्यातील (Pune) थिएटर्सच्या बाहेर पोलिसांच्या गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
पठाण सिनेमानं रिलीजच्या आधीच 4.19 लाखांहून अधिक अँडवान्स बुकींग झालं आहे. पठाण सिनेमा 45-50 कोटींचं ओपनिंग कलेक्शन करेल अशी शक्यता सिनेअभ्यासकांकडून वर्तवण्यात आली आहे. पठाण हा सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा तीन भाषेत रिलीज झालाय. एकूण 5200 स्क्रिन, विदेशात 2500 स्क्रिन्ससह एकूण 7700 स्क्रिन्स वर्ल्ड वाईल्ड पठाण रिलीज झाला आहे.
सिनेमात अभिनेत्री डिंपल कापाडिया (Dimple Kapadia) भारतीय सुरक्षा व्यवस्थेची अधिकारी दाखवण्यात आली आहे. जी पठाणबरोबर काम करते. एका सीसीटीव्ही मधून दीपिकाची (Deepika Padukon) पहिली झलक दाखवण्यात आली आहे. दुष्मनांशी लढून आलेला पठाण हेलिकॉप्टर उडवताना दिसत आहे. कुर्सी की पेटी बांध लीजिए क्योंकी मौसम बिघडने वाला है, म्हणत पठाणमध्ये शाहरुखची (Shahrukh Khan) दमदार एंट्री दाखवण्यात आली आहे.
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाला विरोध करणार नसल्याचे जाहीर केले आहे. सेन्सॉर बोर्डाच्या सूचनेनुसार चित्रपटातील गाण्याचे वादग्रस्त बोल आणि दृश्ये काढून टाकण्यात आले आहे. बेशरम रंग (Besharam Rang) गाण्यात दीपिका स्विम सूटमध्ये दिसत आहे. शाहरुख खानबरोबर असलेला रोमँटिक सीन मात्र कट करण्यात आला आहे. ऑरेंज बिकीनीमध्ये दीपिका शाहरुख बरोबर रोमान्स करताना दिसत नाहीये.