ताज्या बातम्यादेश - विदेश

संतापजनक! मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार

मणिपूर | Manipur Viral Video – मणिपूरमध्ये (Manipur) संतापजनक प्रकार घडला आहे. जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मणिपूरमधील थौबाल जिल्ह्यात 4 मे 2023 रोजी घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार, अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, आरोपींना दोन महिने उलटूनही अटक झालेली नाहीये.

या संतापजन घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. तसंच या व्हायरल व्हिडीओबाबत पोलीस अधीक्षक के. मेघचंद्र सिंह यांनी निवेदन जारी केलं आहे. या निवेदनात ते म्हणाले की, “दोन महिलांना नग्न करत त्यांची धिंड काढल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 4 मे 2023 रोजी ही घटना घडली आहे. या घटनेनंतर अज्ञात आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार, अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.”

तसंच या संतापजनक प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. आरोपींना राज्य पालीस दल लवकरात लवकर अटक करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत असल्याचंही, पोलिसांनी नमूद केलं आहे. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये