ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरणधुमाळीसिटी अपडेट्स

साहेब राजीनामा मागे घ्या… राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा राॅकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबई | Sharad Pawar – शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांचा राजीनामा मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शरद पवारांनी त्यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केलं आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यानं अंगावर राॅकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.

“सध्याच्या राजकारणात सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. त्यासाठी शरद पवार हे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही”, असं आत्मदहन करणाऱ्या कार्यकर्त्यानं म्हटलं आहे.

शरद पवारांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. अशातच आज (5 मे) शरद पवारांचा राजीनामा राष्ट्रवादीच्या निवड समितीनं फेटाळला आहे. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवारांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये