ताज्या बातम्यामहाराष्ट्र

महत्त्वाची बातमी! ‘या’ जिल्ह्यांना पुढील चार दिवस यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई | Yellow Alert To Districts – नुकताच हवामान विभागाकडून कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, पुणे, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसंच हवामान विभागाकडून ६ ते ९ जूनपर्यंत १३ जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

सध्या मान्सून सरींसाठी परिस्थीती अनुकूल नाही. तसंच ६ ते ९ जून या कालावधीमध्ये हवेचा दाब काही भागांमध्ये किंचीत कमी होत आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून राज्यातील १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, सर्वसाधारणपणे अंदमानमध्ये मान्सून २२ मे दरम्यान येतो. मात्र यावर्षी त्याला अपवाद ठरल्याने मान्सून 16 मे रोजी दाखल झाला. त्यानंतर केरळमध्येही चार दिवस अगोदर दाखल झाल्याने आनंदाचे वातावरण होते, पण अरबी समुद्रात आल्यानंतर मान्सूनचा वेग मंदावला आहे. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये