ताज्या बातम्यामनोरंजन

मेट गालामध्ये इशा अंबानीने परिधान केला हिऱ्यांपासून बनवलेला गाऊन; काळ्या डॉल बॅगची सगळीकडे चर्चा

Met Gala 2023 : न्यूयॉर्कमध्ये आयोजित फॅशन इव्हेंट (Met Gala 2023) मध्ये बॉलिवूडमधील अनेक सितारे त्याप्रमाणे प्रसिद्ध उद्योगपतींनी भाग घेतला. बॉलीवूड आणि हॉलिवूड स्टार्सने हजेरी लावली. या इव्हेंटमध्ये अभिनेत्री आलिया भटने डेब्यू केला आहे. यावेळी या कार्यक्रमात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते भारतातील प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानींची मुलगी ईशा अंबानीने. ईशाने या कार्यक्रमात घातलेले कपडे आणि दागिन्यांची सगळीकडे चर्चा सुरू आहे.

यावेळी इशा संपूर्ण साडी गाऊनमध्ये पाहायला मिळाली. तिच्या ड्रेसवर मोती आणि जगातील सर्वांत महाग हिऱ्यांची नक्षी काढण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय फॅशन डिझायनर पदम गुरंग यांनी ईशाचा हा सुंदर ड्रेस डिझाइन केला आहे. ‘मेट गाला’मध्ये सहभागी होण्याचं हे ईशाचं तिसरं वर्षं आहे. यापूर्वी ईशा 2017 आणि 2019 मध्ये ‘मेट गाला’त सहभागी झाली होती.

या लूकमध्ये ईशा अंबानी खूप स्टायलिश आणि सुंदर दिसत आहे. ड्रेसला शोभेल असा गळ्यात डायमंड नेकलेस ईशाने घातला आहे. ईशाला हिऱ्यांची खूप आवड आहे. घालून तिचा लूक पूर्ण केला. 2019 मध्येही ईशाने पदम गुरंगचा यांनी डिझाईन केलेला ड्रेस परिधान केला होता. तो ड्रेस बनवण्यासाठी 350 तासांपेक्षा जास्त वेळ लागला होता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये