अनुपम खेर यांचं संपूर्ण देशात होतंय कौतुक, काश्मिरी पंडितांच्या भवितव्यासाठी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

मुंबई | Anupam Kher – बॉलिवूडचे (Bollywood) ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांचं संपूर्ण देशात कौतुक होताना दिसतंय. याचं कारण म्हणजे त्यांनी काश्मिरी पंडितांच्या भवितव्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. नुकतंच अनुपम खेर यांनी दिल्लीत आयोजित ‘ग्लोबल काश्मिरी पंडित कॉन्क्लेव्ह’ कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांनी काश्मिरी लोकांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे.
ग्लोबल काश्मिरी पंडित कॉन्क्लेव्हमध्ये अनुपम खेर यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) बद्दल सांगितलं. यावेळी ते म्हणाले, “काश्मीर फाईल्समध्ये काश्मिरी पंडितांच्या समस्या दाखवण्यात आल्या आहेत. या चित्रपटातून आम्ही प्रचंड नफा कमावला आहे. तसंच आपण आधीच परदेशी संस्थांना दान करून त्यांना श्रीमंत केलं आहे. तर आता आपल्या लोकांना, प्रियजनांना दान करणं आवश्यक आहे. त्यामुळे आता मी काश्मिरी पंडितांसाठी 5 लाख रुपये देण्याचे वचन देत आहे.”
अनुपम खेर यांच्या या कृतीचं सध्या संपूर्ण देशातून कौतुक होताना दिसत आहे. सोशल मीडियावरसुद्धा त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहेत. मात्र, काही लोकांनी त्यांच्या या कृतीला राजकीय रंग देऊन त्यांना ट्रोलही करण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी अनुपम खेर यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता त्यांच्या ‘कार्तिकेय 2’ चित्रपटानंही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.