आरोग्यराष्ट्रसंचार कनेक्टसंपादकीय

कोरोनामुळे मेंदू होतो म्हातारा!

कोविडचा मनावरही खोल परिणाम होऊ शकतो. हा विषाणू मेंदूच्या कार्यावरही परिणाम करतो. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की, कोरोनाकाळात मेंदूच्या पेशींवर २० वर्षं ओलांडण्याइतकाच परिणाम होतो. म्हणजेच कोरोनासंसर्ग झाला असेल तर मेंदू २० वर्षं जुना होण्याची शक्यता आहे.

कोरोना संसर्गाच्या प्रभावामुळे व्यक्तीचा बुद्ध्यांक म्हणजेच बुद्धिमत्ता घसरते. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, कोरोना व्हायरसमुळे रुग्णाची बुद्ध्यांक पातळी दहा गुणांनी घसरू शकते. बुद्ध्यांकाला बुद्धिमत्ता किंवा मानवी बुद्धिमत्तेचं मानक म्हणतात. बुद्ध्यांक जास्त असलेली व्यक्ती अवघड कोडंही कमी वेळात सहज सोडवते. या अभ्यासाच्या आधी, शास्त्रज्ञ या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत की, कोविड व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक विकासावर दीर्घकालीन प्रभाव टाकतो. काहीवेळा हा प्रभाव संसर्गातून बरं झाल्यानंतर अनेक महिने टिकू शकतो. याशिवाय लोकांची स्मरणशक्तीही कमी होते. त्यांना जुन्या गोष्टी लक्षात ठेवण्यास त्रास होऊ लागतो. त्याला ‘ब्रेन फॉग’ म्हणतात.

अनेकवेळा कोविडचे रुग्ण बरे झाल्यानंतर काही बोलत असताना अचानक गप्प बसतात. कारण ते पुढील शब्द विसरतात. त्यांना चिंता असू शकते. याचा अर्थ ते काळजी करू लागतील. ब्रिटनमधल्या शास्त्रज्ञांच्या या नवीन संशोधनात सांगण्यात आलं आहे की, कोविड दरम्यान रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांपैकी एकतृतीयांश रुग्ण बरे झाल्यानंतर एक वर्षानंतरही अशीच लक्षणं अनुभवत आहेत.

अभ्यासानुसार, कोविड झाल्यानंतर १२ आठवड्यांनंतर, प्रत्येक सात रुग्णांपैकी एकाने स्मरणशक्ती कमी होण्याची समस्या दर्शवली. हा अभ्यास ‘युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिज’ आणि ‘इम्पेरिअल कॉलेज लंडन’मध्ये करण्यात आला. यामध्ये ४६ रुग्णांचा समावेश होता. त्यांना कोविडमुळे अतिदक्षता कक्षात राहावं लागलं होतं. ब्रिटनमध्ये १.७ दशलक्ष लोक आहेत, ज्यांनी कोविड झाल्यानंतर अशा समस्यांची तक्रार केली होती. त्यानंतर शास्त्रज्ञ चिंंतेत पडले आणि त्यांनी कोविडचा प्रभाव शरीरात किती काळ टिकतो आणि या विषाणूमुळे किती अवयव प्रभावित होतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये