ताज्या बातम्यारणधुमाळी

“नाना पटोले देवेंद्र फडणवीसांच्या नखाचीही…”, चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका

मुंबई | Chandrashekhar Bawankule On Nana Patole – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर खोचक टीका केली आहे. नाना पटोले हे देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) नखाचीही बरोबरी करू शकत नाहीत. त्यांनी आधी स्वत:च्या मतदारसंघात बघावं, मग इतरांवर टीका करावी, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरही निशाणा साधला.

“नाना पटोले यांनी स्वत:च्या जिल्ह्यात जाऊन आपल्या मतदारसंघात काय परिस्थिती आहे, हे बघितलं पाहिजे. शेतकऱ्यांचे धानाचे बोनस महाविकास आघाडी सरकारने देऊ केले आहेत. ते शेतकऱ्यांना मिळाले नाही. त्यांच्या मतदारसंघात अनेक समस्या आहेत. त्याकडे नाना पटोले यांनी लक्ष द्यावं, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मतदारसंघात आणि मुख्यमंत्री असताना, जी विकासकामे केली, त्याची एक टक्का बरोबरीसुद्धा नाना पटोले करू शकत नाही. देवेंद्र फडणवीस यांना वर्ध्याची तसेच महाराष्ट्राची इत्यंभूत माहिती आहे. देवेंद्र फडणवीस संपूर्ण अभ्यास केलेले नेते आहेत”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

पुढे त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. “आपलं कुटुंब आपली जबाबदारी म्हणून तुम्ही मुख्यमंत्री आणि आपला मुलगा उपमुख्यमंत्री हेच दिसले. आताही मुंबईत कोणत्याही बॅनरवर बघितलं तर चारच फोटो आहेत. पाचवा फोटो तुम्हाला दिसणार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंवर ही परिस्थिती आली आहे. त्यांचे 40 आमदार सोडून गेले. 12 खासदार सोडूनही गेले, हे कशामुळे होत आहे, तर ‘आपलं कुटुंब आपली जबाबदारी’ एवढाच त्यांचा हेतू आहे. उद्धव ठाकरेंबरोबर आता कोणताही कार्यकर्ता राहायला तयार नाही. आता त्यांच्या स्टेजवर तुम्हाला चारच लोक दिसतील पाचवा व्यक्ती दिसणार नाही, ही वेळ एक दिवस नक्कीच येणार आहे”, असा टोला बानकुळेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये