ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

नाव आणि चिन्हाच्या लढाईसाठी, ‘ठाकरे गट’ न्यायालयाचे दार ठोठवण्याच्या तयारीत!

मुंबई : (Chandrakant Khaire On Eknath Shinde) शनिवार दि. 8 रोजी रात्री उशिरा केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवण्याचा निर्देश दिले. तोंडावर आलेल्या अंधेरी-पुर्व पोटनिवडणूकीत हा ठाकरेंनी शह देण्यासाठी शिंदेंनी केला प्लॅन यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे ठाकरेंनी मोठा धक्का बसला असला तरी, यातून शिंदे गटाने नेमकं काय कमावलं हे देखील पाहणं तितकच महात्त्वाचं आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागू असे ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले आहे. निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय आमच्यासाठी धक्कादायक असल्याचेही ते म्हणाले. यामुळे आमच्यासारख्या कोट्यावधी शिवसैनिकांना खूप दुःख झालं आहे. सर्वोच्च न्यायालयात १६ आमदारंच्या निलंबनाची याचिका प्रलंबित असताना हा निर्णय घेतला गेला, यामुळे कुठेतरी शंका निर्माण झाले.

तर दुसऱ्या बाजूला खासदार अरविंद सावंत म्हणाले, निवडणूक आयोगाने ज्या प्रकारे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे, ते पाहता या सर्व प्रकाराचा तपास व्हायला हवा. सध्या देशात काय सुरु आहे? आम्ही मुंबई उच्च न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये