राजकारणातील सर्वात मोठी बातमी! काँग्रेसचे 22 आमदार फुटणार? फडणवीसांची तयारी सुरु
मुंबई : (Chandrakant Khaire On Nana Patole) एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीने महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला. त्यामुळं सत्तासंघर्षाचं प्रकरण हे सर्वोच्च न्यायालयात गेला. शिवसेनेने केलेली शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रेची एक याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले, “16 आमदार अपात्र झाल्यास शिंदे-फडणवीस सरकार पडणार आहे. म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले आहेत,” असा दावा केल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळखळ उडाली आहे.
खैरेंच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्येही ही बंडखोरी मिळणार का? यापुर्वी अशोक चव्हाण,असलम शेख यांच्यासह अनेक काँग्रेस आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा झाली. त्यात आता खैरे यांनी पुन्हा एकदा काँग्रेस आमदार फडणवीसांच्या सोबत जाण्याची शक्यता वर्तवली असल्याने राजकीय वातावरण तापलं आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी यावर उत्तर दिलं असून ते म्हणाले, ज्यांना आपला स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही त्यांनी इतरांच्या पक्षावर बोलण्याचे कोणतेही कारण नाही, असा खोचक टोला पटोले यांनी खैरे यांना लगावला आहे. तर खैरे यांच्या विधानामुळे आता काँग्रेस-शिवसेना असा नवा वाद पाहायला मिळण्याची शक्यता आहे.