ताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महायुतीच्या ६ आमदारांचे विधानपरिषदेचे सदस्यत्व रद्द; काय आहे कारण ?

महाराष्ट्रातील नव्या सरकारचा आज शपथविधी पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस हे मुंबईतील आझाद मैदानावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तर दुसरीकडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सहा आमदारांना विधान परिषदेत जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

हे सहा जण विधान परिषद सदस्य विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आले आहेत. त्यामुळे २३ नोव्हेंबरपासून या सर्व आमदारांचे विधान परिषदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाने हा निर्णय घेतला आहे. एका व्यक्तीस दोन्ही सभागृहाचे सदस्य होता येत नसल्याने त्यांचे विधान परिषदेचे सदस्यत्व रद्द केले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नागपूरचे प्रवीण दटके, आमश्या पाडवी, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधान परिषदेचे सदस्य होते. हे सर्व 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आले आहेत. ते आता विधानसभेत दाखल होणार आहेत.

विधानसभा निवडणुकीत मिळवला विजय 

– भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे कामठी विधानसभेतून निवडणूक जिंकले.

– भाजपचे गोपीचंद पडखळकरांनी जत विधानसभा मतदारसंघातून बाजी मारली.

– भाजपचे प्रवीण दटके यांनी नागपूर मध्य विधानसभेतून निवडणूक जिंकली.

– शिंदे गटाचे आमश्या पाडवी अक्कलकुवा मतदारसंघातून विजयी झाले.

– राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश विटेकर यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघातून बाजी मारली.

– भाजपचे रमेश कराड यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये