राज्यस्तरीय छ. संभाजीमहाराज गौरव पुरस्कार जाहीर

पुरंदर किल्ल्यावर मान्यवरांना वितरण
जेजुरी : मराठा सेवा संघ – संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय छत्रपती संभाजीमहाराज गौरव पुरस्कार २०२२ पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्येष्ठ संपादक श्रीराम पवार, साहित्यिक क्षेत्रातील योगदानाबद्दल इंद्रजित सावंत आणि सिनेक्षेत्रातील योगदानाबद्दल सिनेअभिनेते निखिल चव्हाण यांस जाहीर करण्यात आलेला आहे.
छत्रपती संभाजीमहाराजांच्या जयंती सोहळ्यानिमित्त शनिवारी (दि. १४) पुरंदर किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात खा. युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले, खा. सुप्रिया सुळे, राज्यमंत्री विश्वजित कदम, आ. रोहित पवार, आ. संजय जगताप, मराठा सेवा संघ – संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे, विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणार्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येत असते.
आजवर दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेते अमोल कोल्हे, अभिनेते भरत जाधव, अभिनेते अंकुश चौधरी, अभिनेते अशोक समर्थ, संपादक चंद्रकांत पाटील, संपादक तुळशीदास भोईटे, संपादक नीलेश खरे, संपादक अजित चौहान, सुहास खामकर, लेखक सुशील धसकटे, शरद तांदळे यांनासुद्धा छत्रपती संभाजीमहाराज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरीचे विश्वस्त संदीप जगताप यांचाही विशेष सन्मान केला जाणार असल्याची माहिती अजयसिंह सावंत यांनी दिली.