ताज्या बातम्यारणधुमाळी

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकमेव अडाणी मंत्री”

मुंबई | Vinayak Raut On CM Eknath Shinde – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काल (1 ऑगस्ट) तीन दिवसांची ईडीची कोठडी सुनावण्यात आली. यानंतर शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिंदे हे राज्यातील एकमेव अडाणी मंत्री आहेत, त्यांच्या शिक्षणाचा पत्ता नाही अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे.

पुण्यातील एका उद्यानाला एकनाथ शिंदे यांचं नाव देण्यात आलं होतं. त्यानंतर त्याच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री जाणार होते पण नावावरून वाद निर्माण झाल्यामुळे कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यानंतर विनायक राऊतांनी हे वक्तव्य केलं आहे. “गुडघ्याला बाशिंग बांधून फिरणारे एकनाथ शिंदे हे आहेत. त्यांच्या शिक्षणाचा पत्ता नाही तर प्रशासन कसं चालवायचं याचं भान नाही. महाराष्ट्रातील एकमेव अडाणी मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा उल्लेख इतिहासात होईल.” असं राऊत म्हणाले.

“ज्या उद्यानाला शिंदे यांचं नाव द्यायचं होतं, त्या उद्यानाचा प्रस्ताव पुणे महापालिकेने मंजूरच केला नाही पण फक्त एकनाथ शिंदे यांचं नाव येतय म्हणून उद्घाटनाला जाणे यापेक्षा जास्त अडाणीपणा कोणता असू शकतो.” असा टोला देखील विनायक राऊत यांनी लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये