मनोज जरांगेंच्या सभेत गोंधळ! आंदोलकाचा मंचावर भाषण करण्याचा प्रयत्न

पुणे : मराठा आरक्षणासाठी आक्रमक लढा उभारलेले मनोज जरांगे पाटील यांच्या सध्या राज्यभरात विविध भागामध्ये सभा होत आहेत. आरक्षणासाठी सरकारला २८ ऑक्टोंबरपर्यंतची मुदत दिल्यानंतर जरांगे पाटील राज्यभर दौरे करत आहेत. आज (शुक्रवार, २० ऑक्टोंबर) पुण्याच्या राजगुरूनगरमध्ये त्यांची सभा होत असून या विराटसभेतून जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, या सभेवेळी मनोज जरांगे यांनी जमलेल्या गर्दीला संबोधित केलं सरतेशेवटी मंचावर काल आत्महत्या केलेल्या कावळे यांना श्रध्दाजंली देण्यासाठी सर्वजण उभे असतानाच अचानक एका आंदोलकाने मंचावर भाषण करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे सभेमध्ये गोंधळ झाल्याचे दिसून आले. या तरूणाने मंचावर जाऊन भाषण करण्याचा आणि घोषणा देण्याचा प्रयत्न केला.
मनोज जरांगे यांनी भाषण केलं त्यावेळी ते म्हणाले सर्वांना मला भेटायचं असतं पण शक्य होतं नाही, या मुद्द्यावर त्यांनी भाषण संपवलं, त्यानंतर काल मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या आंदोलकाला श्रध्दाजंली देण्याचं ठरलं. त्याबाबतची घोषणा देखील झाली. त्याचवेळी एक तरूण मंचावर आला. तो आक्रमक दिसून आला, त्याने माईक हातात घेत बोलण्याचा प्रयत्न केला. वेळीच त्याला आयोजक आणि पोलसांनी आवरण्याचा प्रयत्न केला.