कसब्यात कॉंग्रेसला धक्का! उमेदवारीवरून कॉंग्रेसमध्ये अंतर्गत वाद; दाभेकारांची बंडखोरी करत उमेदवारी जाहीर

पुणे : Kasba Byelection : कसब्यातील पोटनिवडणूक चांगलीच रंगलेली आहे. एकीकडे भाजप (BJP Pune) आणि महाविकास आघाडी (Maahavikas Aghadi) एकमेकांच्या समोर असताना दोन्ही पक्षांत अंतर्गत अशांतता दिसत आहे. भाजपने टिळक कुटुंबाला उमेदवारी न दिल्याने टिळक कुटुंब तसेच ब्राम्हण कार्यकर्त्यांकडून निराशा व्यक्त केली जात आहे. तर महाविकास आघाडीत देखील कॉंग्रेसने (Congress Pune) टिळक (Mukta Tilak) कुटुंबातील सदस्याला उमेदवारी न दिल्याने अंतर्गत नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. (Kadbapeth Byelection Congress)
अशातच कॉंग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. मुक्त टिळकरांचे पुतणे रोहित टिळक (Rohit Tilak) यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी कॉंग्रेसच्या बाळासाहेब दाभेकर (Balasaheb Dabhekar) केली होती. मात्र, त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत कॉंग्रेसने रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे नाराज दाभेकर यांनी स्वतःच या निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयाने कॉंग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दाभेकरांचं म्हणनं काय आहे ?
दाभेकारांकडून कसब्यात कॉंग्रेसने रोहित टिळक (Rohit Tilak Pune Congress) म्हणजे दिवंगत आमदार मुक्त टिळक यांचे पुतणे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, माझी मागणी मान्य झाली नाही त्यामुळे बंडखोरी करत असल्याचं दाभेकारांनी म्हटलं आहे. मी कॉंग्रेसमध्ये चाळीस वर्षे राहिलो आहे. कॉंग्रेसने मला काहीही दिलेलं नाही. मात्र, ज्या उमेदवाराने कॉंग्रेसच्या विरुद्ध निवडणूक लढवली, जो आत्ता दोन चार वर्षांपूर्वी कॉंग्रेसमध्ये आला त्याला उमेदवारी घोषित करण्यात आली. त्यामुळे मी बंडखोरी करत आहे. हि निवडणूक मी शेवटपर्यंत लढवणार आहे. अशी प्रतिक्रिया दाभेकारांनी दिली आहे.