मतमोजणी लाबंणीवर! लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसचा आक्षेप
मुंबई – Legislative Council Election 2022 महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे मतदान काही वेळापूर्वीच पुर्ण झाले असून लवकरच मतमोजणीला सुरूवात होणार आहे. या दरम्यान कॉंग्रेसकडून भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. या आक्षेपामुळे अद्यापही मतमोजणीला सुरूवात झालेली नाही.
भाजप पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार मुक्ता टिळक हे दोघेही व्हीलचेअरवर पोहचले होते. दरम्यान या निवडणूकीत गुप्त मतदान आहे. पण टिळक, जगतापांची मतपत्रिका इतर नेत्यांनी मतदान पेटीत टाकली. दोघांच्या मतदानावेळी 2 सहकारी नेते उपस्थित असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.
दरम्यान, काँग्रेसने घेतलेला आक्षेप राज्य निवडणूक आयोगाने फेटाळून लावला आहे. यावर बोलतना, काँग्रेसने घेतलेला आक्षेप म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.