ताज्या बातम्यादेश - विदेश

“…राम मंदिरावर बॉम्बफेक करून आरोप मुस्लिमांवर करतील”, काँग्रेस आमदाराचं खळबळजनक वक्तव्य

बंगळुरू | Loksabha Election 2024 – आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे. तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. यादरम्यान आता एका काँग्रेस (Congress) आमदारानं खळबळजनक वक्तव्य केलं आहे. भगवा पार्टी राम मंदिरावर बॉम्बफेक करून आरोप मुस्लिमांवर करतील, असं धक्कादायक वक्तव्य काँग्रेस आमदार बी.आर.पाटील यांनी केलं आहे.

कर्नाटक भाजपनं X वर (ट्विटर) एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत बी.आर.पाटील यांनी म्हटलं आहे की, मोदींनी आगामी लोकसभा निवडणूक जिंकावी यासाठी भाजप राम मंदिरावर बॉम्ब फेक करू शकते. तसंच एकगठ्ठा हिंदू मत मिळवण्यासाठी आरोप मुस्लिमांवर लावला जाऊ शकतो.” तर बी.आर.पाटील यांनी हे वक्तव्य कधी केलं आहे? याबाबत स्पष्टता नाहीये. तर याबाबतचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे.

भाजपनं बी.आर.पाटील यांच्या व्हिडीओवरून काँग्रेसला टार्गेट केलं आहे. याबाबत भाजपनं ट्विट करत म्हटलं आहे की, काँग्रेसच्या सदस्यांनी हिंदुत्वाच्या पायावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. तसंच काँग्रेसनं हिंदू-मुस्लिम तणाव वाढवून सरकारवर आरोप करण्यासाठी आधार तयार केला आहे. तर काँग्रेस मंत्र्यानं चुकून तो उल्लेख केला आहे, असंही भाजपनं म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये