मेक इन इंडिया आणि हेट इन इंडिया एकत्र राहूच नाहीत शकत; इन्फोग्राफिकच्या माध्यमातून राहुल गांधींची टीका
नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी एक इन्फोग्राफिक शेअर केलं आहे. इन्फोग्राफिकच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत भारतातून बाहेर पडलेले सात ऑटोमोटिव्ह ब्रँड दाखवले आहेत. ज्यांचा थेट परिणाम देशातील बेरोजगारी वाढण्यावर झाला आहे. त्यावरून पंतप्रधान मोदी यांना निशाणा साधत ‘मेक इन इंडिया आणि हेत इन इंडिया एकत्र राहूच शकत नाहीत असं राहुल गांधी म्हणले आहेत.
2017 मध्ये शेवरलेट, 2018 मध्ये मॅन ट्रक्स, 2019 मध्ये फियाट आणि युनायटेड मोटर्स, 2020 मध्ये हार्ले डेव्हिडसन, 2021 मध्ये फोर्ड आणि 2022 मध्ये डॅटसन हे ब्रँड भारतातून बाहेर गेले आहेत. त्यामुळे देशातील ७ जागतिक ब्रँड, ९ कारखाने, ६४९ डिलरशिप्स आणि तब्बल ८४ हजार नोकऱ्या गेल्या आहेत असं राहुल गांधी म्हटलेत.
मार्च महिन्यात देशातला बेरोजगारीचा दर 7.60 टक्के होता. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) नुसार, जानेवारी आणि डिसेंबरमध्ये अनुक्रमे 6.57 टक्के आणि 7.91 टक्क्यांच्या तुलनेत भारतातील बेरोजगारीचा दर फेब्रुवारीत 8.10 टक्क्यांवर पोहोचला आहे. मार्च महिन्यात अनेक कारणांवरून देशभरात धार्मिक हिंसाचार वाढला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी हेट इन इंडिया असं म्हटलं आहे.