“दिघेंसोबत काय घडलं माहिती होत तर…,” आनंद दिघेंच्या पुतण्याचा शिंदेंना खडा सवाल!

मुंबई : (Kedar Dighe On Eknath Shinde) धर्मवीर आनंद दिघे त्यांच्याबाबतीत खूप मोठं राजकारण करण्यात आलं आहे. दिघेसाहेब यांच्या बाबतीत ज्या काही घटना घडल्या त्याचा मी स्वःता साक्षीदार आहे. काही गोष्टी मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत. तेव्हा जास्तीचे बोलाल तर दिघेसाहेब यांच्यासोबत काय घडले, हे मी उघडे करेन, असा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुचक इशाराच दिला होता.
दरम्यान, शिंदे यांच्या इशाऱ्यानंतर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, धर्मवीरांसोबत काय घडले याचे साक्षीदार होता, तर २५ वर्ष का गप्प राहिलात? ठाणेकरांशी आणि दिघेसाहेबांशी सर्वात मोठी प्रतारणा तुम्ही केली आहे, असा टीकास्त्र सोडत सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल? असा खडा सवाल एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. शिंदेंच्या या वक्तव्यानंतर आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत पुन्हा नव्या चर्चेला उधान आले आहे.
एकीकडे महाराष्ट्राच्या सगळ्या विभागातून शिवसेना आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे ज्या धर्मवीर आनंद दिघे यांचं उठता-बसता नाव घेतात त्यांचेच पुतणे केदार दिघे मात्र सेनेच्या पडझडीच्या काळात उद्धव ठाकरेंसोबत खंबीरपणे उभे राहिले आहेत. एकनाथ शिंदे जेव्हाजेव्हा मातोश्रीवर-उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत, त्याला प्रत्युत्तर द्यायला केदार दिघे सर्वांत आधी पुढे येत आहेत.
.