आरोग्य

 रतन टाटा यांनी दिला आठवणींना उजाळा; म्हणाले…

दिसपुर : उद्योगपती रतन टाटा यांचे समाजिक कार्यात मोठे योगदान आहे. त्यामुळेच रतन टाटा लोकांच्या मनावर अधिराज्य करताना दिसत आहेत. काल आसाममधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी काही जुण्या आठवणींना उजाळा देत एक निश्चय केला रतन टाटा म्हणाले, आपल्या आयुष्यातील शेवटची वर्षे आरोग्यासाठी समर्पित करत आहोत यावेळी ते कमालीचे भावूक झाले. त्यांनी आपल्या आयुष्यातील शेवटच्या मिशनबद्दलही भाष्य केलं. आसाममधील ७ कर्करोग देखरेख रुग्णालयांचे उद्घाटन आणि नवीन एका रुग्णालयाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते.

मुंबईतील परळ येथे असलेल्या टाटा मेमोरियल सेंटरचे आरोग्य क्षेत्रात मोठे योगदान आहे. हे केंद्र सुरू होण्यामागेही एक रंजक कथा आहे. लेडी मेहेरबाई टाटा यांचे १९३२ मध्ये रक्ताच्या कर्करोगाने निधन झाले. यानंतर त्यांचे पती दोराबजी टाटा यांनी त्यांच्या पत्नीला परदेशी रुग्णालयातील सुविधा भारतात रुग्णालय सुरू करण्याचे स्वप्न पाहिले. दोराबजी टाटांच्या मृत्यूनंतर हे स्वप्न साकार करण्यासाठी नौरोजी सकलतवाला यांनी प्रयत्न केले. मात्र, जेआरडी टाटा यांच्या प्रयत्नानंतर टाटा मेमोरियल सेंटरचे स्वप्न साकार झाले. सुमारे ८० खाटांपासून सुरू झालेले हे रुग्णालय आज ६०० हून अधिक खाटांचे आहे. या रूग्णालयात आज जगभरातील कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार केले जातात.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये